(चिपळूण)
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा आज शेवटच्या घटका मोजत आहेत. हिच परिस्थिती बहादूरशेख उर्दू शाळेची सुध्दा होती. शाळेवर एकच शिक्षक असूनही जियाऊल्ला खान यांनी आपल्या शाळेचा कायापालट करून टाकला आहे. ज्या शाळेत पाच विद्यार्थी मोठ्या जिकिरीने होते. त्या शाळेचा जणू काही नकाशाच बदलून टाकला. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणाचे धडे तर दिलेच, त्या शिवाय या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भौतिक गरजा सुध्दा पूर्ण केल्या.
शाळा सुटल्यानंतर दररोज परिसर भेटी देऊन शाळाबाह्य तसेच दाखलपात्र मुले शोधून काढली. आणि आपल्या शाळेत स्वखर्चाने शाळेत आणण्यास सुरुवात केली. आणि शेवटच्या घटका मोजणाऱ्या शाळेला सुमारे पंचवीस पटावर विराजमान करून शिक्षण विभागा कडून दुसरा शिक्षक ही मंजूर करवून घेतला. त्यांच्या या जिद्दीला आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर, जिल्हा नेते प्रदीप पवार, जिल्हा कोषाध्यक्ष महेश मोरे, चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ, तालुका सचिव सुरेश धुमाळ यांनी जमातुल मुस्लिमीन बहादूरशेख चे सचिव अस्लम वांगडे, मौलाना जाबिर कासिमी आणि शा.व्य.स.सदस्य शराफत मुल्लाजी, सदफ चिपळूणकर तसेच अफसाना चिपळूणकर यांच्या उपस्थितीत जियाऊल्ला खान सर यांंचे सत्कार केला.
जियाऊल्ला खान सर यांनी सत्कार स्वीकारुन शाळेत आणखी हिरिरीने कार्य करुन शाळेचे नांव लौकिक करु, अशी आशा यावेळी व्यक्त केली.