(दापोली)
एकटी राहणाऱ्या महिलेच्या घरावर दगड मारणे, खिडकी व दरवाजा वाजविणे, असे प्रकार करणाऱ्या एका व्यक्तीवर दाभोळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. रुपेश आडविलकर (रा. कोळथरे, कुंभारवाडी, सध्या रा. दाभोळे-चव्हाणवाडी, दापोली) असे त्याचे नाव आहे.
दाभोळमधील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून हा सर्व प्रकार घडत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या महिलेल्या घराच्या छतावर दगड मारणे, खिडकी वाजविणे, दरवाजा वाजविण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह घटनाही घडत होत्या. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. त्यातून तो रुपेश असल्याचे समोर आले आहे.