(मुंबई)
सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दिवस ते आजारी होते. आजारपण बळावल्याने त्यांचे निधन झालं आहे. आज २६ फेब्रुवारी रोजी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. उधास परिवार.’ यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
पंकज उधास हे गझल गायनाच्या विश्वातील एक मोठे नाव होते. त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदी गझल घराघरात पोहोचवली. त्यांच्या चिठ्ठी आई है या गझल गीताला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ चित्रपटात या गझलचा समावेश करण्यात आला होता. पंकज उधास यांनी ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चले तो कट ही जायेगा’ आणि ‘तेरे बिन’ या गझलांना आपला आवाज दिला होता.
https://www.instagram.com/p/C3zq1JatKmq/?utm_source=ig_embed&ig_rid=5757fb3f-861b-4ed6-8579-5180057953c1