(ज्ञान भांडार)
उच्च आणि दर्जेदार शिक्षण घेणे ही आजकाल सोपी गोष्ट नाही. सध्या उच्च शिक्षण घेणं सर्वसामान्यांना परवडण्याबाहेर गेलं आहे. बुद्धीमत्ता असूनही अनेकजण केवळ पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. मात्र प्रामाणिकपणे जर तुम्हाला शिक्षण करायचं असेल तर बँका तुम्हाला तुमचं स्वप्न करण्यास मदत करतात. या कर्जामुळे अनेकांची अडचण कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची होणारी परवड काहीशी दूर झाली आहे. परंतु बँकेतून शैक्षणिक कर्ज कसं मिळवायचं हे अनेकांना माहिती नसते. या कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात याचीही कल्पना बहुतेकांना नसते. जर तुम्हाला देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल, तर आता तुमच्यासाठी मार्ग खूप सोपा झाला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही भारतात शिक्षण कर्ज घेऊन पुढील अभ्यास पूर्ण करू शकता. जर तुमच्या घरातील कोणाला शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
शैक्षणिक कर्ज म्हणजे काय :
शैक्षणिक कर्ज म्हणजे बारावीनंतरच्या पदवी किंवा पदव्युत्तर तसंच उच्च शिक्षणासाठी बँकाकडून व्याजाने घेतली जाणारी रक्कम. उच्च शिक्षणाच्या शुल्काव्यतिरिक्त खर्चासाठीही (शैक्षणिक खर्च) ही कर्ज मिळू शकतं. शैक्षणिक कर्ज सरकारी तसंच खाजगी बँकाही उपलब्ध करुन देतात उच्च शिक्षणासाठी कोणत्याही बँक किंवा खाजगी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाला विद्यार्थी कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज म्हणतात. तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असले तरी कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. या योजनेचा उद्देश हा आहे की, अशा गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर ते चांगली नोकरी मिळवू शकतील.
शैक्षणिक कर्जाचे प्रकार :
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतात साधारणपणे 4 प्रकारचे कर्ज आहेत. त्यात करिअर एज्युकेशन लोन, प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन, पालक कर्ज आणि अंडरग्रेजुएट लोन हे आहेत.
करिअर एज्युकेशन लोन – जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.
प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन – विद्यार्थ्यांने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन घेतले जाऊ शकते.
पालक कर्ज – जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.
अंडरग्रेजुएट लोन – शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.
शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे :
विद्यार्थी कर्ज घेण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक
सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा. नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा. बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या. बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा. बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करा.
शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
वयाचा पुराव
पासपोर्ट साइज फोटो
मार्कशीट
बँक पासबुक
आईडी प्रूफ
एड्रेस प्रूफ
कोर्स डिटेल्स
विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड
पालकांचा उत्पन्नाचा दाखला