दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने खेडमधील १ दापोलीमधील २ व मंडणगडमधील १ अशा एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४ रुग्णवाहिका मंजुर झाल्या.
कोविड १९ चा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्याचे नियोजन करण्यासाठी आमदार श्री. योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांमधील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. सदर भेट दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील विविध समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या निवारणासाठी तात्काळ शासन दरबारी पाठपुरावा केला. सदर समस्यांमधील मुख्य समस्या होती ती रुग्णवाहिकेची. परंतु आता दापोली मतदारसंघातील खेड तालुक्यातील आंबवली, दापोली तालुक्यातील फणसु व केळशी तसेच मंडणगड तालुक्यातील देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णावाहिका मंजुर झाली आहे. सदर रुग्णवाहिका येत्या १० ते १५ दिवसांत जनतेच्या सेवेसाठी रुजु होतील.
तसेच मतदारसंघातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे व पालकमंत्री श्री. अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार श्री. योगेश कदम यांनी सांगितले.