कोरोना विषाणूचा संसर्ग देशात अधिक झपाट्यानं पसरु लागला आणि याचे थेट परिणाम जनमानसावर झाले. अनेक व्यवहार ठप्प झाले, शिक्षणसंस्थाही यातून वाचू शकल्या नाहीत. थेट शाळेत जाऊन शिक्षण घेण्यावर साधारण वर्षभराहून अधिक काळापासून निर्बंध आणण्यात आले. पण, असं असलं तरीही ऑनलाईन वर्ग सुरु ठेवत शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष मात्र पूर्ण करण्यात आलं. याच धर्तीवर आता शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या फी मध्ये कपात करावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत._