(रत्नागिरी)
शहरालगतच्या नाचणे येथे घराच्या जीन्याखाली चार्जिंगसाठी लावलेल्या दुचाकीतील बॅटरी व चार्जर चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद नंदकुमार पेटकर (57, नाचणे, नूतननगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटकर यांनी इलेक्ट्रीक दुचाकी बॅटरी चार्जिंगसाठी जीन्या खाली लावली होती. दुसर्या दिवशी बॅटरी चार्जिंग झाली की नाही हे पाहण्यासाठी ते गेले असता बॅटरी व चार्जर दिसून आला नाही. त्यांनी 4 हजार 500 रुपयांची दुचाकीची बॅटरी व 500 रुपयांची चार्जर चोरीस गेल्याची फिर्याद शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.