(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकावर वाहन जप्तीची कारवाई करून ती वाहने खेड येथील एसटी डेपो च्या आवारात उभी करून ठेवतात. मात्र या ठिकाणच्या एका गाडीची बॅटरी व इंधन चोरीस गेल्याचे प्रकार बुधवारी दिनांक 13 एप्रिल रोजी समोर आला आहे. वाहन चालकाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला
ज्ञानेश्वर मोरे राहणार जावली याचे गाडी मॅक्झिमो एम एच 11 B L 2530 प्रवेश कोंडेकर राहणार शिरवली तालुका खेड यांनी विकत घेतली होती. मात्र त्याच्या नावावर गाडीची कागदपत्रे केली नव्हती. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने परवाना व इतर कागदपत्रे नसल्याने सदर गाडी जप्त करून खेड डेपोत गाडी उभी केली होती. गुरुवारी दिनांक 13 रोजी दंड भरून व कागदपत्रे व इतर सोपस्कार करून गाडी ताब्यात घेण्यास कोंडेकर एसटी आगारात परिसरात आले असता गाडीतील बॅटरी व इंधन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले मात्र तक्रार घेण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला. मनसे वाहतूक सेनेचे विशाल कापडे, सिकंदर मांगी व कार्यकर्त्यांनी केअर एसटी डेपो व्यवस्थापक प्रशांत करवंदे यांची भेट घेतली. यावेळी करवंदे यांनी सांगितले की, मी या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची भेट घेतली आहे. त्यांनी आम्हाला प्रादेशिक परिवहन अधिकारी सोबत चर्चा करून मग तक्रार देण्यास सांगितले आहे. एसटी महामंडळाने वाहन उभे करून ठेवण्यात आल्यामुळे पार्किंग चार्ज घेतला आहे, असे जप्त केलेल्या वाहनाची सुरक्षितेचा जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न केला असता कोंडेकर यांची गाडी आमच्या एसटी डेपो उभी होती त्यामुळे त्यासाठी बॅटरी देण्याची व्यवस्था आम्ही करतो असे आश्वासन एसटी डेपो प्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली
या चोरी प्रकरण पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून चोरट्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी मनसे वाहतूक शाखेचे विशाल भाई कापडी एसटी डेपो मॅनेजरकडे बोलताना केली आहे.