(संगलट- खेड/इक्बाल जमादार)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड कळबणी बुद्रूक गावाजवळ तवेरा कारवरील चालकाच्या ताब्यातील कारवरील चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात स्वाती विजय फुटाणे वर 46 रा बोरीवली, काजल विजय फुटाणे वय 25 रा बोरीवली, किरण विजय फुटाणे वय 27, रश्मी रविंद्र भालगुडे वय 37, विजय मारूती फुटाणे वय 51, राजेश गणेश कहोर वय 35 सर्व रा बोरीवली यांना उपचारार्थ कळबणी बुद्रूक येथील उपजिल्हा रूग्णालयात मदत ग्रुपच्या पथकाने प्रगती रूग्णवाहीकेने दाखल केले.
अपघाताचे वृत्त कळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदतकार्य केले. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीवरून बोरीवलीहून जयगडकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून तवेरा कार (नंबर समजला नाही) वरील चालक चालवत जात असताना दि 15/4/2022 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कार चालकाचा झोपेच्या भरात आपल्या ताब्यातील कारवरचा ताबा सुटून रस्त्याच्या डाव्या बाजूस खोलवर भागात कोसळून अपघात झाला. अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.