(खेड)
महामार्गावरील भरणे येथे मुंबई परेल येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नासाठी जाणाऱ्या खासगी बसला अपघात होऊन २५-३० जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई परळ येथून वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. यामध्ये दहा वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. तर २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे.
वनिता गोमले (५८), अविनाश गोमले (३१), अल्पेश गोमले (३४), संदिप गोमले (४५), अनंत सिताराम खेराडे (६७), राजाराम गोमले (५२), रविंद्र साळुंखे (६१), वैजयंती गोमले (५५), विठ्ठल बोले (५६), लक्ष्मण गोमले (६६), ओंकार गोमले (२६), मनोहर गोमले (६२), भावेश गोमले (१९), अस्मिता गोमले (५८), बाळकृष्ण गोमले (६४), नितेश गोमले (२३), दशरथ राजाराम गोमले (४५), अल्पेश गोमले (२८), दिनेश गोमले (२६), महेंद्र गोमले (३२), अस्मिता गोमले (४५), सदानंद गोमले (४७) अशी जखमीची नावे आहेत.