(चिपळूण/प्रतिनिधी)
युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले असता, आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही बालकलाकार कु. आर्यन विलास पाटील याला भेटीला वेळ दिला.
श्री आदित्यसाहेबांनी कु. आर्यनने आजपर्यंत केलेले लघुपट,मालिका व चित्रपट यांची सविस्तर माहिती घेतली. अल्पावधीत शंभरहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविल्याबद्दल त्यांनी कु. आर्यनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्याने नुकतेच चित्रीकरण पूर्ण केलेल्या नंदा आचरेकर लिखित व विलास पाटील दिग्दर्शित परीकथा या लघुपटास व त्याच्या रुपेरी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कलेचा वारसा जपणाऱ्या ठाकरे परिवाराकडून मिळालेल्या शाबासकीबद्दल पाटील परिवार भारावून गेले आहेत.
श्री. आदित्य ठाकरेसाहेबांकडून कु. आर्यनचे कौतुक होत असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री. विनायक राऊतसाहेब, चिपळूण युवासेना तालुकाधिकारी श्री. उमेशजी खताते, शिवसेना कार्यकर्ता श्री. समीर कदम, श्री सुनिल उर्फ नाना टेरवकर आणि पाटील परिवार उपस्थित होते.
युवासेना प्रमुख श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी युवासेना तालुका प्रमुख श्री. उमेशजी खताते यांचे मोलाचे सहकार्य लाभले