(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथील गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग समृद्धी योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत उपस्थित होते.
किरण उर्फ भैया सामंत यांनी संस्थेला व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक मुसा काजी, युवा सेना जिल्हाप्रमुख केतन शेट्ये, संस्थेचे अल्ताफ कुरेशी, फारुख जरीवाला, साजिद मेमन, इसाक मेमन, अकील मेमन, अमजद महळूंगकर, असलम बुखारी, नवेद मुल्ला, अली अजगर अत्तर, इशाक मेमन आदी मान्यवर उपस्थित होते.