(रत्नागिरी)
ॲकेडमी मार्गदर्शक उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व ॲकेडमी अध्यक्ष भैय्याशेठ सामंत यांच्या सहकार्याने समाजामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवून आपण समाजाचे काही देणे लागतो या विचार धारणेतून मार्गक्रमण करीत आहे. 15 आँगस्ट या स्वातंत्र्यदिनी जे काही कारणाने निराधार झाले आहेत त्यांना ख-या अर्थाने प्रेमाची, आपुलकीची गरज असल्याचे जाणवल्यामुळे हा दिवस या बांधवांच्या समवेत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पालकमंत्री व भैय्याशेठ सामंत उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत. सदर कार्यक्रम नगरपालिका प्रशासक श्री बांबर यांच्या आदेशानुसार श्री संभाजी काटकसर व शालेय मुलांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नगररचना कर्यालयातील सेवानिवृत्ती अधिकारी श्री सुहास शिंदे उपस्थित होते. त्यांच्या व देसाई हायस्कूलच्या शिक्षकांच्या हस्ते निराधारांना व शालेय मुलांना जिलेबीसह अल्पोपहार, टीशर्ट व साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रथम कार्यक्रम ॲकेडमीत करण्यात आला त्यानंतर अभ्युदय नगर येथील नगरपालिकेच्या निवारा केंद्रांत संपन्न झाला. त्यानंतर जेथे गरजवंत दिसतील तेथे व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भविष्यात भव्य स्वरूपात सर्व सोयींनी युक्त निवारा केंद्र आठवडा बाजार येथे होत आहे, त्याठिकाणी त्यांची सोय केली जाणार असून अँकेडमी तर्फे या बांधवांसाठी रोजगार निर्मिती करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करून ख-या अर्थाने जिल्ह्यातील निराधार बांधवांचा प्रश्न मागीं लावणार आहे. सदर निवारा केंद्र भैय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून सामंत कुटुंबीयांच्या स्वभावानुसार सामाजिक जाणीवेतून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. आता चालू असलेले निराधार केंद्र प्रशासक श्री बांबर व काटकर आपल्या पूर्ण टिमसह उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. दानशूर व्यक्तींनी सदर निवारा केंद्राला वस्तू स्वरूपात किंवा रोख रक्कम स्वरूपात मदत करून आपण समाजाचे काही देणे लागतो या ॲकेडमीच्या विचारधारेत सहभागी व्हावे, असे आवाहन ॲकेडमी तर्फे करण्यात आले आहे.