(रत्नागिरी)
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार हेल्मेट सक्तीमधून नागरिकांना मुक्ती मिळाली आहे. वाहतूक नियमांबाबत प्रथम जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल व तिचा अहवाल परिवहन आयुक्तांना सादर केला जाईल असे या आदेशात म्हटले आहे.
पुणे येथील जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सदरचे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी परित केले असून आता या आदेशामुळे रत्नागिरीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रत्नागिरीतील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आता या सूचनेनुसार उद्यापासून रत्नागिरीकरांची हेल्मेट सक्तीतून मुक्तता होणार आहे.