दि. 20 जून रोजी सकाळ अग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था, द -फार्म आणि कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी -पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदराव निकम कृषि महाविद्यालयात पदवीधर विद्यार्थासाठी अग्रीकल्चर स्टार्ट-अप या अतिशय महत्वाच्या विषयावर एकदिवशीय मोफत कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत द -फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रितेश पोपळघट, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. सर्वेश घंगाळे, कृषि विभाग प्रमुख व उपसरव्यवस्थापक सकाळ -अग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था SIILC पुणे श्री. अमोल बिरारी यांनी अग्रीकल्चर स्टार्ट-अपमधील नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात कशा आणव्यात, तसेच ग्रॅण्ट आणि फडिंग कसे मिळावायचे यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी -पालवणचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अपर्णा यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोशन मोहिरे यांनी केले तसेच संस्थेच्या इतर प्राध्यापकांचे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य लाभले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !