सरडा हा त्यांना निसर्गाकडून मिळालेल्या खास गिफ्टसाठी प्रसिद्ध आहे. जगात प्रत्येक जीवाकडे आपली एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन जगत असतात. असंच एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. म्हणजेच सरड्याचे रंग बदलण्यामागील मुख्य कारण त्याचे स्वतःचे संरक्षण. जेव्हा जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवतो तेव्हा तो स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रंग बदलतो. याशिवाय शिकारीसाठी आणि मादी गिरगिटांना आकर्षित करण्यासाठी नर गिरगिटांकडून रंगही बदलला जातो. गिरगिट परिस्थितीनुसार रंग बदलतो.
सरडा हा प्राणी प्रसंगानुसार आपला रंग ज्या वास्तूच्या सानिध्यात असेल तसा बदलत असतो. जसे कि गुलाबी, निळा, लाल, नारिंगी, हिरवा, काळा, तपकिरी, फिकट निळा, पिवळा, जांभळा इत्यादी. पण हे तो आपल्या बचावात्मक पद्धतीसाठी करत असतो. या प्राण्याला इंग्रजी मध्ये कैमीलियन म्हणतात. सरडा हा उष्णकटिबंधीय, पर्वतात, वाळवंटात व गवताळ प्रदेशात राहतो. यांची काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची जीभ लांब असून, खूप वेगाने जिभी मार्फत आपली शिकार करतो. हा आपला प्रत्येक डोळा स्वतंत्रपणे हलवू शकतो. ज्यामुळे तो एकाच वेळी दोन भिन्न वस्तूंचे निरीक्षण करू शकतो. हा आपला डोळा शरीराच्या ३६० अंशात फिरवू शकतो. याचे डोळे खूप तीष्ण असून याला स्वतःपासून ५ ते १० मीटर अंतरावचे कीटक दिसतात. हा छोटे छोटे कीटक व फुलपाखरू इत्यादी वर जगतो.
सरडा हा दोन्ही व्हिसिबल आणि अल्ट्रावायलेट लाईट मध्ये पाहू शकतो. सरड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आणि ते आफ्रिका, मादागास्कर, स्पेन, पोर्तुगाल, भारत, दक्षिण एशिया इथे आढळतात. सरड्याच्या त्वचेवर एक थर असतो, त्यात विविध रंग असतात. आणि त्या थराखाली गुआनाईन क्रिस्टल्स असलेल्या पेशी असतात. सरडा त्या क्रिस्टल्स ची जागा बदलवतो. त्यामुळे तो आपला रंग सहज बदलू शकतो. सरडा आपला रंग दुसऱ्याची शिकार करण्याआधी व दुसऱ्याची स्वतः शिकार होण्याआधी आपला रंग बदलवतो. प्रतिस्पर्धीवर हल्ला करते वेळी हा खूप चमकदार होतो व त्याला समर्पण करायचे असल्यास गडद रंग करतो.
वाळवंटातील सरडा हा उष्णता शोषण्यासाठी काळा रंग धारण करतो. कारण काळा रंग उष्णता शोषक असतो. यांच्या काही प्रजाती मधल्या सरड्याची हाडे जर अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या खाली धरली, तर ती चमकतात. ज्याला बायोजेनिक फ्लूरोसेन्स असे म्हणतात.
एका रिसर्चनुसार, सरडे त्यांच्या भावनांनुसार रंग बदलतात. राग, आक्रामकता, एकमेकांशी बोलण्यासाठी आणि दुसऱ्या सरड्यांना आपला मूड दाखवण्यासाठी सरडे त्यांचां रंग बदलतात. रिसर्चनुसार, सरडे अनेकदा त्यांचा रंग नाही तर केवळ चमक बदलतात. तेच धोक्याच्या स्थितीत सरडे आपल्या रंगासोबतच आकारही बदलतात. सरडे त्यांचा आकार मोठाही करू शकतात आणि गरज पडेल तर छोटाही करू शकतात. सरड्यांच्या शरीरात फोटोनिक क्रिस्टल नावाचा एक थर असतो. याने सरड्यांना वातावरणानुसार रंग बदलण्यास मदत मिळते. फोटोनिक क्रिस्टलचा थर प्रकाशाच्या परावर्तनाला प्रभावित करते. ज्याने सरड्यांचा रंग बदललेला दिसतो. जसे की, जेव्हा सरडा जोशमध्ये असतो तेव्हा फोटोनिक क्रिस्टलचा थर सैल पडतो. याने लाल आणि पिवळा रंग परावर्तित होतो. तेच सरडे जेव्हा शांत होतात तेव्हा हे क्रिस्टल प्रकाशातील निळ्या तंरगांना परावर्तित करतात. त्यासोबतच सरड्यांमध्ये क्रिस्टलचा आणखी एक थर असतो, जो इतर थरांपेक्षा मोठा असतो. फार जास्त प्रकाश असल्यावर हा थर सरड्यांना गरमीपासून वाचवतो.