[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
तालुक्यातील सोमेश्वर नालंदा बुद्ध विहाराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तरुण विकास मंडळाच्या पुढाकाराने गुरुवारी (दिनांक २३ मे २०२४) सोमेश्र्वर बुद्ध विहार येथे सकाळच्या सुमारास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शिबिरात ३६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
तरुण विकास मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी पुढे येत स्वंयस्फूर्तपणे रक्तदान केले. ‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. रक्तदाब तपासणी करून रक्तदानास सक्षम असलेल्या अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. या शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घडवला आहे. यामध्ये तरुणांसह तरुणींनी देखील सहभाग घेऊन रुग्णसेवेत महान योगदान दिले आहे. तसेच एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे तरूण विकास मंडळाला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने गौरव सन्मानपत्र देण्यात आले.
या शिबिरासाठी डॉ. वैष्णवी मुधोळकर, डॉ. हर्षवर्धन पुंड, डॉ. सूरज बोडके, डॉ. सूरज बोडके, टेकनीशियन श्रेया नवाथे, ब्रदर निरंजन चाफले, रक्तपेढी परिचर प्रतीक अंभोरे, संदीप वाडेकर आदीनी मोलाचे सहकार्य केले.
यांनी केले महादान
दिपक पवार, राकेश वासूदेव पवार, प्रशांत पंवार, सौरभ पवार, नेहा पवार 6) विलास जाधव, समीक्षा कांबळे, प्रज्ञा कदम, समीर पवार, प्रभाकर पवार, साक्षी सोवळे, दिव्या कदम, सुगत कांबळे, सुशांत पवार, संदेश कांबळे, तुषार पवार, अदिती घाटविलकर, कल्पेश पवार, हर्षल कांबळे, शैलेश पवार, ऋषिकेश पवार, मनिष कांबळे,प्रदिप सोवळे, विनय आयरे ,रुपेश पवार, स्वप्निल सोवळे, प्रसाद सोबळे, आयुष पवार, अंकित घोळके, प्रणित पवार, शैलेश घाणेकर, वैभव पवार, अनिकेत जाधव, आर्यन जाधव, सुयश पवार, प्रितम मयेकर यांनी रक्तदान केले. या बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामुळे जिल्हा रुग्णालयातील गरजूंना मदत मिळणार आहे.