(दापोली)
दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री देवी मरीआई क्रीडा मंडळ, पांगारवाडी, जालगाव आणि दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज् आयोजित दापोली प्रो कबड्डी लीग (पर्व तीन) विकास कन्स्ट्रक्शन, रिया फायटर, शुक्रतारा प्रतिष्ठान दापोली, साई स्टार टाळसुरे, अद्विक रायडर्स, रुची स्पोर्ट्स चंद्रनगर अशा सहा संघानी सहभाग घेऊन स्पर्धा उत्साहात संपन्न केली. दापोली प्रो कबड्डी लिगसाठी मनोज भांबिड, सुयोग लाले, नरेंद्र (नानू ) भडवळकर व श्री देवी मरीआई क्रीडा मंडळ, पांगारवाडी जालगाव यांचे सर्व कार्यकर्ते, कबड्डी प्रेमी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
या स्पर्धेत विजेतेपद रोख रक्कम रु.३३,३३३ /- व आकर्षक चषक शुक्रतारा प्रतिष्ठान यांनी पटकाविले तर उपविजेतेपद रोख रक्कम रु.२२,२२२ /- व आकर्षक चषक साईस्टार टाळसुरे, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक रोख रक्कम रु.७,७७७ व आकर्षक चषक अनुक्रमे रिया फायटर्स व रुची स्पोर्ट्स चंद्रनगर यांनी प्राप्त केले. वैयक्तिक बक्षीसांमध्ये स्पर्धेतील उजवा चढाईपट्टू तेजस राळे, स्पर्धेतील उजवा कोपरा रक्षक अविष्कार साळवी, डू ऑर डाई स्पेशालिस्ट रेडर साहिल माने, सुपर टॅकल स्पेशालिस्ट डिफेंडर प्रणित (पिंट्या) आंबेकर, स्पर्धेतील डावा चढाई पट्टू सागर पारदुले, स्पर्धेतील डावा कोपरा रक्षक सिद्धेश गौरत, स्पर्धेतील उजवा मध्य रक्षक संजोग लाले, स्पर्धेतील डावा मध्य रक्षक ऋतिक शिंदे, उगवता तारा गौरीज सणस, स्पर्धेतील उत्कृष्ट प्रशिक्षक बाबू वाडकर, बेस्ट मोमेंट्स ऑफ टुर्नामेंटचा मान सयन गावखडकर यांनी संपादित करून स्पर्धेतील चुरस निर्माण केली.
या सर्व खेळाडूंना रोख रक्कम ३०००/- ( तीन हजार प्रत्येकी ) व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहन उके या खेळाडूची निवड करुन रोख रुपये १०,००० (दहा हजार) व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला टी शर्ट भेट देऊन गौरविण्यात आले. खेळाडूंवर संघमालक, कबड्डी प्रेमीं व आयोजकांकडून बक्षीसांचा वर्षांव झाला.
दापोली प्रो कबड्डी पर्व 3 या लिगसाठी पंच प्रमुख संदेश झगडे, तर पंच म्हणून तुषार पाटील, अक्षय सुर्वे, सुधिर कदम, संदीप क्षीरसागर, उदय शिंदे, समीर शेवडे, विरेंद्र केळस्कर यांनी व टेक्निकल ऑफिशियल म्हणून सत्यवान दळवी यांनी काम केले. स्पर्धेतील सर्व पंचांनी उत्कृष्ट निर्णय देऊन दापोली प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी मोलाचे योगदान दिले. दुर्वा स्पोर्ट्स व शौर्य ट्रॉफीज यांजकडून स्पर्धा यू ट्यूब ला लाईव्ह दाखविण्यात आली. स्पर्धेतील बक्षीस समारंभ कार्यक्रमाला मिहीर महाजन, अक्षय फाटक, चारुलता कामतेकर, कीर्तिकुमार वेलदूरकर यांसमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.