(जीवन साधना)
महर्षी मार्कंडेय यांनी सांगितलेली तीन कार्य सर्वात उत्तम मानले गेली आहेत. ही तीन कार्य करणारा मनुष्य कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करतो आणि त्याला शुभफळही प्राप्त होते.
श्लोक –
पुण्यतीर्थाभिषेकं च पवित्राणां च कीर्तनम्।
सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः।।
तीर्थस्थळांवर स्नान
तीर्थक्षेत्रावर स्वतः देवतांचा निवास मानला गेला आहे. तीर्थस्थळांवर जाऊन तेथे पूजा केल्याने आणि तेथील कुंड किंवा नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. काही तीर्थस्थळांवर स्नान केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो.
पवित्र वस्तूंचे नाव घेणे
गोमूत्र, शेण, गोदुग्ध (गायीचे दुध), गोशाळा हवन, पूजन, तुळस, मंदिर, अग्नि, पुराण, ग्रंथ अशा विविध गोष्टींना पवित्र मानले गेले आहे. यामधील खाण्यायोग्य गोष्टींचे सेवन आणि ग्रंथाचे वाचन महत्त्वपूर्ण मानले जाते, परंतु एखाद्या व्यक्तीला हे करणे शक्य नसेल तर तो या गोष्टींचे केवळ नाव उच्चारून पुण्य प्राप्त करू शकतो. प्रत्येक माणसाने हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या गेलेल्या या वस्तींचे नाव पवित्र मनाने नेहमी घेत राहावे. यामुळे निश्चितच शुभफळ प्राप्त होऊ शकतात.
सत्पुरुषांशी चर्चा
सत्पुरुष म्हणजे विद्वान, ज्ञानी, चरित्रवान आणि सत्यवादी व्यक्ती. प्रत्येक मनुष्याने आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी सत्य आणि योग्य मार्गाची निवड करावी. मनुष्याला योग्य मार्ग विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती दाखवू शकतो. ज्या व्यक्तीला योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट, धर्म-अधर्म गोष्टींचे ज्ञान असते आपण त्यांचा आदर करणे आवश्यक आहे. अशा लोकांची चर्चा करून आपण आपल्या हिताच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. मनुष्याने नेहमी ज्ञानी लोकांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे
@ यशवंत नाईक