(नवी दिल्ली)
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कार-2024’ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी (22 एप्रिल) झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता मिथुन चक्रवर्ती, सुप्रसिध्द गायिका उषा उत्थप या काही मान्यवरांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, एस.जयशंकर तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आले.
सोमवारी पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्र राज्यातून पाच मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रात, दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. मनोहर कृष्ण डोळे यांना औषधी, डॉ. जहीर इसहाक काझी यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रात तर कल्पना मोरपारिया यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्मविभूषण, पद्
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी