(देवरूख)
मौजे आंबव, (कोंडकदमराव), ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथे दि. २७/०३/२०२४ रोजी श्री. गणपत दौलत जोशी यांचे आंबा-काजू बागेमध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे पोलीस पाटील श्री. प्रकाश पांचाळ, यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता विहीरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. सदरील विहीर ही श्री. प्रकाश पांचाळ यांच्या आंबा-काजूच्या बागेमध्ये असून ती १० फूट व्यास, ३ फुट कठडा असलेली, २५ फूट खोल असून सदरची विहिर जांभा चिराने बांधकाम केलेली आहे.
सदर विहीरीमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने लाकडी शिडी विहीरीत सोडल्यानंतर खाली उतरुण दोरीचा फास टाकून बिबट्याला अलगत फासामध्ये अडकवून बाहेर घेण्यात आले. विहीरीमध्ये पडलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख, श्री. आनंदराव कदम याचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदरचा बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे २ ते ३ वर्षाचा असुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचे दिसून आले. सदर बिबट्यास लाकडाची चिता रचुन जाळुन नष्ट केले गेले. सदर प्रकरणी पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर करत आहेत.
सदरील कार्यवाही विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री.दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्री. वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री. प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर, श्री. तौफिक मुल्ला, वनरक्षक, श्री. आकाश कडूकर, श्री. अरुण माळी व पोलीस पाटील, श्री. प्रकाश पांचाळ, श्री. शशिकांत माने, श्री. प्रशांत जोशी, ग्रामस्थ उपस्थित होते. यांनो मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.