(जीवन साधना)
या पृथ्वीवर सर्व ऐश्वर्य आणि धन संपत्ती देणाऱ्या देवी लक्ष्मीची दररोज उपासना करावी. महालक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार तिन्ही लोकात सर्वात जास्त संपदा आणि ऐश्वर्य देवराज इंद्राकडे आहे. परंतु कधी कधी इंद्र देवालाही आपल्या अहंकारामुळे श्री विहीन म्हणजे दरिद्री व्हावे लागले होते. त्यानंतर इंद्र देवाने एक विशेष पूजा करून लक्ष्मीची कृपा प्राप्त केली होती.
एकदा इंद्र देव ऐरावत हत्तीवर बसून चालले होते. रस्त्यामध्ये त्यांना दुर्वास ऋषी भेटले. ऋषींनी गळ्यातील माळ काढून इंद्रदेवाकडे फेकली. ती माळ इंद्र देवाने ऐरावत हत्तीच्या गळ्यात घातली. उग्र वासामुळे ऐरावत हत्तीने ती माळ गळ्यातून काढून पृथ्वीवर टाकली. हे पाहून दुर्वासा ऋषींना राग आला आणि त्यांनी इंद्र देवाला शाप दिला की, ‘ऐश्वर्याचा गर्व झालेल्या इंद्र देव तू मी दिलेल्या माळेचा आदर केला नाही. ही केवळ एक माळ नसून लक्ष्मीचे धाम होते. यामुळे तुझ्या अधिकारात असलेली तिन्ही लोकातील संपत्ती लवकरच अदृश्य होईल.
महर्षी दुर्वासा यांच्या शापाने त्रिलोक श्रीहीन झाले आणि इंद्रदेवाची राज्यलक्ष्मी समुद्रात बुडून गेली. देवतांच्या प्रार्थना आणि विनंतीवरून देवळी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यानंतर सर्व देवता, ऋषीमुनींनी त्यांचा अभिषेक केला. देवी महालक्ष्मीच्या कृपेने संपूर्ण विश्व समृद्धशाली आणि संपन्न झाले. देवराज इंद्राने लक्ष्मीची अशाप्रकारे स्तुती केली.
1.देवी लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक केला.
2.केशर, रांगोळी, अक्षता, पान, सुपारी, फळ, फूल, दूध, बत्ताशे, कुंकू, मध, लवंग इ गोष्टी अर्पण करून पूजेनं केले.
इंद्रदेवाने अशाप्रकारे महालक्ष्मीची स्तुती केली
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्षि्म नमोस्तुते॥1॥
अर्थ- इंद्रदेव म्हणाले- “श्रीपीठवर स्थित आणि देवतांनी पूजित झालेली महामाये तुला माझा नमस्कार आहे”. हातामध्ये शंख, चक्र आणि गदा धारण करणारी देवी महालक्ष्मी तुला माझा नमस्कार आहे.
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्षि्म नमोस्तु ते॥2॥
अर्थ-गरुडावर स्वर होऊन कोलासुरचा नाश करणारी तसेच सर्व पापांचे हरण करणारी महालक्ष्मी तुला प्रणाम आहे.
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि।सर्वदु:खहरे देवि महालक्षि्म नमोस्तु ते॥3॥
अर्थ-सर्वकाही ज्ञात असणारी, सर्वांना वर देणारी, सर्व दुष्टांचा नाश करणारी आणि सर्वांचे दुःख दूर करणारी देवी लक्ष्मीला माझा नमस्कार आहे.
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्ति मुक्ति प्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्षि्म नमोस्तु ते॥4॥
अर्थ-सिद्धी, बुद्धी, भोग आणि मोक्ष देणारी भगवती महालक्ष्मीला माझा सदैव नमस्कार आहे.
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्षि्म नमोस्तु ते॥5॥
अर्थ-हे देवी! हे आदिशक्ती! हे माहेश्वरी! योगातून प्रकट झालेल्या भगवतीला माझा नमस्कार आहे.
स्तोत्र पाठचे फळ
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।9।।
अर्थ-जो व्यक्ती भक्तिभावाने या महालक्ष्म्यष्टक स्तोत्राचे नियमित पाठ करतो त्याला सर्व सिद्धी आणि राजवैभव प्राप्त होऊ शकते.
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।10।।
अर्थ-जो दररोज एकदा याचे पाठ करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. जो व्यक्ती दोन वेळेस पाठ करतो त्याला धन-धान्य प्राप्त होते.
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।11।।
अर्थ-जो व्यक्ती दिवसातून तीन वेळेस याचे पाठ करतो त्याचे सर्व शत्रू नष्ट होतात आणि त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते.
महालक्ष्मीच्या पुढील ११ नावांचे स्मरण करून या स्तोत्राचे पाठ करणे अधिक फलदायी मानले गेले आहे.
पद्मा, पद्मालया, पद्मवनवासिनी, श्री, कमला, हरिप्रिया, इन्दिरा, रमा, समुद्रतनया, भार्गवी आणि जलधिजा इ. नावाने पूजीत देवी महालक्ष्मी वैष्णवी शक्ती आहे.
@ यशवंत नाईक