(राजापूर)
तालुक्यातील परुळे पाटीलवाडी येथे पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयतीने वार केले. या प्रकरणी एका विरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार ३ मार्च रोजी दुपारी ३ वा. सुमारस घडली आहे. निशांत विश्राम सावंत (रा. परुळे राजापूर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विद्या मुकुंद माने यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Also Visit : “मुख्यमंत्री माझी शाळा”मध्ये आगाशे विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम
त्यानुसार, संशयित निशांत सावंत हा त्यांचा सख्खा चुलत पुतण्या आहे. ते एकमेकांच्या शेजारी शेजारीच रहात असून गेल्या १० वर्षांपासून त्यांच्यात संडासची टाकी बांधण्याच्या कामावरुन वाद-विवाद सुरु आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी फिर्यादी यांचा मुलगा घराबाहेर उभा असताना संशयित निशांत सावंतने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील कोयत्याने त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारुन दुखापत केली. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी विद्या माने मध्ये पडल्या असता निशांतने त्यांनाही ढकलून दिले. यात त्यांना मुका मार लागला असून संशयिताविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ३२४, ३२३,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visit us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1