(फुणगूस / एजाज पटेल)
सकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांपुढे जाण्यास आवडते. मेहनत आणि ज्यावेळी आपल्याला भूमिका करण्यास संधी मिळेल त्यावेळी त्या संधीचे सोने केले पाहिजे असे झी मराठीच्या ‘तू चाल पुढे ‘या मालिकेत मयुरीच्या भूमिकेतून पुढे आलेली मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने सांगितले.
संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित सिनेमेनिया या थीम डिनरच्या कार्यक्रमात ती आली होती.
कणकवली येथील मूळची असलेल्या वैष्णवी कल्याणकर हिने कोकणात आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यानंतर ती एमबीए मुंबई येथे पूर्ण केले शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकपात्री अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती त्यानंतर वेब सिरीज तसेच ‘बांबू’ या चित्रपटामध्ये तीने भूमिका साकारली. ‘तू चाल पुढे…’ या झी मराठी मधील मालिकेमध्ये तिने मयुरीचे पात्र साकारले होते. या मालिकेचे चारशेहुन अधिक भागात काम केले. खरंतर आपल्याला पॉझिटिव्ह भूमिका करण्यास आवडते असे तिने सांगितले .
कला क्षेत्रामध्ये काम करण्यास संधी असून ज्या ठिकाणी आपल्याला अभिनय करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी आपण सहभागी होऊन आपल्याला सिद्ध केले पाहिजे असा सल्लाही तिने शेवटी दिला.