(रत्नागिरी)
प्रातः विधीसाठी गेलेला प्रौढाचा पाय घसरून नदीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी घडली. सूर्यकांत महादेव पाचकर (५५, रा. सोमेश्वर-सतीवाडी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
सूर्यकांत पाचकर हे सोमवारी सकाळी घराच्या बाजूला असलेल्या नदीत प्रातः विधीसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून ते पाण्यात पडले आणि बुडून मृत्यू झाला. बराच वेळ ते घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान नातेवाइकांना ते नदीच्या पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. नातेवाइकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले