रत्नागिरी : अत्याधुनिक थ्रीडी यंत्रणेचा वापर करून अवकाशात सैर करण्याचा अनुभव घेता यावा यासाठी रत्नागिरी शहरात माळनाका येथे तारांगण उभारण्यात येत आहे. १२०० चौरसमीटर क्षेत्रावरही उभारण्यात येणार्या या वास्तूचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकावेळी ६५ व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त विज्ञान व प्रशिक्षण प्रदर्शन सभागृह, अतिमहनीय व्यक्तींकरता कक्ष, सुसज्ज सभागृह, खुले थिएटर, प्रत्यक्ष प्रक्षेपण सभागृह, विज्ञानप्रदर्शन व मनोरंजन सभागृह आदी सुविधांसाठीचे नियोजन केले गेले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात होणाऱ्या तारांगणाच्या रूपाने जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील मुलांना व पर्यटकांना पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतुहलात वाढ व्हावी आणि अवकाशातील रोचक गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने अत्याधुनिक थ्रीडी प्रक्षेपण यंत्रणा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित बसवण्यात येणार आहे. त्यासाठी खास अमेरिकेतून उपकरणे मागवली असून येत्या काही दिवसात ती बसवली जाणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांसह पर्यटकांना आता खगोलविश्वाची सफर घडू शकेल. अवकाशात असलेल्या ग्रहतार्यांची रचना, ग्रहणांसारख्या घटना या ठिकाणी पाहता येतील. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. इन्फोव्हिजन या कंपनीमार्फत येथील यंत्रणा बसवण्याचे काम चालू आहे. येथील तज्ञ सदस्यांच्या पथकाने तारांगण, खगोलशास्त्र, दृकश्राव्य इंटिग्रेशन, थ्रीडी अॅनिमेशन आणि ग्राफिक्स, मोठ्या स्क्रीन डिस्प्ले किंवा आर्किटेक्चर या क्षेत्रातील काम केले आहे. मोबाईल तारांगण शो आयोजित करणे, टेलिस्कोप आणि वेधशाळा सेटअप् बसवणे, दृकश्राव्य यंत्रणा बसवणे, प्रकाशनियंत्रण प्रणाली ही कामे केली जाणार आहेत.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !