(खेड)
बनावट सोने तारण ठेवून आयडीबीआय बँकेची ३७ लाख ३५ हजार ८० रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बँकेचा सराफ संशयित प्रदीप रामचंद्र सागवेकर (रा. सुकिवली- सोनारवाडी) याला न्यायालयाने १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
बँकेत सोने तारण कर्जासाठी ठेवण्यात आलेले बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवत तसे प्रमाणपत्र देत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयडीबीआय बँकेचे जितेंद्र नारायणदास शाह यांनी पोलिसांत तक्रार केली होती.
या प्रकरणी बँकेने नियुक्त सराफ प्रदीप सागवेकर याला पोलिसांनी अटक केली होती. सरकारी वकील स्मिता कदम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर सौरभ सागवेकर, नीलिमा सागवेकर, सागर सागवेकर, नीलेश सागवेकर, सुधीर राणिम, अक्षता राणिम, समीर रघुनाथ म्हसळकर, राहुल अनंत सकपाळ, कमलाकर हरिश्चंद्र पालकर यांनाही अटक झाली होती.