(गुहागर)
गुहागर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ६६ ग्रामपंचायती मध्ये सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. गुहागर तालुक्यातील कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड सभेमध्ये उपस्थित सर्व सरपंचांच्या सहमतीने झालेली आहे.
शनिवार दि.२३.१२.२०२३ रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सरपंच संघटनेच्या सभेमध्ये ११ पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे ती पुढीलप्रमाणे
1) श्री.मंगेश तानाजी सोलकर – अध्यक्ष.
2) सौ.वैष्णवी वैभव नेटके – उपाध्यक्ष.
3) श्री.जनार्दन पांडुरंग आंबेकर – सचिव.
4) श्री.सचिन रामचंद्र म्हसकर – कार्याध्यक्ष
5) श्री.समित सत्यवान घाणेकर – खजिनदार
6) सौ.प्रियांका निलेश सुर्वे – सदस्य
7) सौ.आर्या अमित मोरे – सदस्य
8) सौ.जान्हवी धनंजय विखारे – सदस्य
9) श्री.आशीर्वाद दयानंद पावसकर – सदस्य
10) श्री.विजय अर्जुन तेलगडे – सल्लागार
11) श्री.नारायण धाकू आग्रे – सल्लागार
वरील नवनिर्वाचित गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे मावळते अध्यक्ष चैतन्य धोपावकर, सचिव सचिन म्हसकर, खजिनदार महेश जामसूदकर आणि सल्लागार प्रविण वेल्हाळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.