(सुरत)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमध्ये बांधलेल्या सुरत डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन केले. यूएस डिफेन्स हेडक्वॉर्टर पेंटागॉनपेक्षा ही सर्वात मोठी एकमेकांशी जोडलेली आणि ऑफिसची इमारत आहे. १५ मजल्यांचे एकूण ९ टॉवर असून, ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. या इमारतींमध्ये ४५०० हून अधिक कार्यालये आहेत. त्यावरून सुरतमध्ये किती मोठे डायमंड मार्केट उभे केले आहे, याचा अंदाज येतो.
सुरत डायमंड बाजार ३,५०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाले. त्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण झाले. एसडीबीची स्थापना सुरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हीसाठी एक-स्टॉप हब म्हणून केली आहे. सुरत जगातील ९२ टक्के नैसर्गिक हिरे बनवते. मोदींनी सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनापूर्वी सुरतमधील विमानतळ ते खजोद येथील डायमंड बोर्स इमारतीपर्यंत रोड शो केला. त्यानंतर या डायमंड बोर्सचे उद्घाटन केले.
सुरतमध्ये बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये ९ ग्राउंड टॉवर आणि १५ मजले आहेत. नऊ आयताकृती बुरुज मध्यवर्ती मणक्याने जोडलेले आहेत. यामध्ये ३०० चौरस फूट ते १ लाख चौरस फुटांपर्यंतच्या ४,५०० हून अधिक कार्यालयीन जागा आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे.
कार्यालयांव्यतिरिक्त डायमंड बोर्स कॅम्पसमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, कॉन्फरन्स हॉल, मल्टीपर्पज हॉल, रेस्टॉरंटस, बँका, कस्टम क्लिअरन्स हाऊस, कन्व्हेन्शन सेंटर, प्रदर्शन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, मनोरंजन क्षेत्र आणि क्लब यासारख्या सुविधा आहेत. गेल्या काही आठवड्यात अनेक हिरे व्यापारी कंपन्यांनी येथे आपली कार्यालये सुरू केली आहेत.
दिल्लीतील वास्तुविशारदांनी या इमारतीची रचना केली. ही इमारत दिल्लीस्थित वास्तुविशारद सोनाली आणि मनित रस्तोगी आणि त्यांची फर्म मॉर्फोजेनेसिस यांनी तयार केली. मनित रस्तोगी यांनी इमारत बनवण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे अशी इमारत कशी डिझाइन करायची ज्यामध्ये सुमारे ६५ हजार लोक ये-जा करू शकतील. मात्र, ते आम्हाला साकारता आले, त्याचा आनंद आहे, असे म्हटले.
सुरत डायमंड बोर्सची इमारत ६७ लाख स्क्वेअर फूटपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे. जे जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स आहे. संपूर्ण जगभरात सुरत हे हि-यांसाठी प्रसिद्ध आहे. या इमारतीचे नाव यावर्षी ऑगस्टमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. ही इमारत ३५.५४ एकरमध्ये पसरलेली आहे. त्याचे बांधलेले क्षेत्र ६७ लाख चौरस फूट आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठअया कार्यालयीन संकुलाचा विक्रम अमेरिकेच्या पेंटागॉनकडे होता. पेंटागॉनचे बिल्टअप एरिया ६५ लाख क्वेअर फूट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी १७ डिसेंबर रोजी सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. याला सुरत डायमंड बोर्स असेही म्हणतात. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावावर होते. यावेळी मोदी म्हणाले की, आज सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हि-याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे, असे म्हटले.