(चिपळूण)
ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकिपर्स संघटनेने नुकतेच हिवाळी अधिवेशनादरम्यान रेशन दुकानदारांच्या मागणीसाठी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष गणपत बाबा डोळसे पाटील, ज्येष्ठ कार्याध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रत्नागिरी जिल्हा आरक्षण दुकानदार केरोसीन व मालक चालक संघटनेचे खजिनदार रमेश राणे तसेच रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सहभागी झाले होते.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रेशन दुकानदार आपल्या मागण्यांसाठी शासन व प्रशासनस्तरावर पाठवा करीत आहेत. मात्र, तितकेसे यश मिळताना दिसत नाही. पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान रेशन दुकानदारांनी भव्य मोर्चा काढला. ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकीपर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाला निवेदन देण्यात आले.
यानुसार आजच्या महागाईच्या निर्देशांकानुसार कमिशनमध्ये वाढ करून मिळावी. माहे डिसेंबर २०२३ आज लाभार्थ्यांना धान्य वितरण झालेले संपूर्ण कमिशन त्वरीत जमा व्हावे. वितरणासाठी 5 G जलद गतीने नेटवर्कचे ई-पॉस मशिन त्वरीत मिळावे. दरमहा मोफत अन्न सुरक्षा अंतर्गत असलेले शिधा पञिका धारकाना धान्य वितरण झालेले वेळोवेळी कमिशन त्वरीत मिळावे. राज्यातील सर्व योजने अंतर्गत असलेले शिधा पञिका धारकांना वितरणा करीता धान्य उपलब्ध करुण मिळावे. राज्यातील सध्या बंद असलेली केरोसिन परवानाधारकाचे पुनर्वसन होणे व त्यांना वितरणासाठी केरोसिन कोठा उपलब्ध करुण देण्यात यावे, अधिक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.