(चिपळूण)
शहरातील वीरेश्वर तलाव येथे एका प्रौढाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:१० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनोद किसनराव मोरे (४५, पाचाड) असे त्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची खबर अशोक कुलकर्णी (चिपळूण पोलिस स्थानक) यांनी दिली आहे. विनोद मोरे हे शहरातील वीरेश्वर तलाव येथे निपचित पडले होते. ही माहिती नागरिकांनी चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी पोलिस गेल्यानंतर मोरे यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अधिक तपास केला जात आहे.