(खेड / भरत निकम)
तालुक्यातील सात्विनगाव येथे समीर प्लॅन्टेशन येथे काम करताना उंचावरून खाली पडलेल्या ५२ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रंजन रामचंद्र बेळगांवकर (५२, रा. कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. उंचावरून पडून जखमी झालेल्या प्रौढास उपचारासाठी लवेल येथील बाई रतनबाई घरडा रूग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते.
अधिक उपचारासाठी हुबळी कर्नाटक येथील रुग्णालयात घेवून जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.