( मुंबई )
आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी नुकतीच प्रत्येक संघाने आपल्या कायम खेळाडूंची यादी जाहीर केली असून, यंदा चेन्नईने धोनीला कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्येही धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार आहे. मुंबई संघातही बरेच फेरबदल झाले असले तरी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहणार आहे. तर गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई संघात दाखल झाला आहे. त्यामुळे गुजरात संघाला हा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आयपीएलच्या संघांनी अनेक खेळाडूंना नारळ दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू बदललेले दिसणार आहेत.
आयपीएल २०२४ साठी चेन्नई संघाने धोनीला कायम ठेवत असतानाच स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला सोडले आहे. यासोबतच ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, आकाश सिंग, अंबाती रायडू (निवृत्त), सिसांडा मगला, भगत वर्मा यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. मुंबई संघातही बरेच फेरबदल झाले आहेत. मात्र, रोहित शर्माकडेच संघाचे नेतृत्व असणार आहे. मुंबई संघाने एकूण ७ खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखवला आहे. यात स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचाही समावेश आहे.
किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल ११ खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन अॅलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव आणि केदार जाधव यांचा समावेश आहे. लखनौ संघाने के. एल. राहुलकडे नेतृत्व कायम ठेवले आहे. तसेच क्विंटन डी कॉक, निकोलस पुरन कायम आहेत. मात्र, जयदेव उनाडकट, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे, मनन वोहरा आदींना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तसेच कोलकाता संघात नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, श्रेयस अय्यर कायम आहेत, तर शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, शकीब अल हसन, लिटन दास यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे कायम ठेवले आहे. यासोबतच जोस बटलर, अश्विन, नवदीप सैनी, संदीप शर्मा कायम आहेत तर जो रुट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर बाहेर पडले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग २०२४ रिटेन्शन डेडलाइनच्या दिवशी तब्बल ८५ खेळाडूंना सोडण्यात आले आहे. तर वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स आणि जो रूट यांनाही सोडण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघांनी अनेक क्रिकेटपटूंना बाहेर काढले आहे. त्यामुळे यावेळी बरेच नवे चेहरे दिसणार आहेत.
सर्व संघांची Retained आणि Released खेळाडूंची यादी…
MI released players list : मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, जे रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर.
MI Retention List : रोहित शर्मा (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरॉन ग्रीन, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश बेरडोर्फ, जैलडॉर्फ्सन , रोमॅरियो शेपर्ड.
2. कोलकाता नाईट रायडर्स
KKR Retention List : श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, जेसन रॉय, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
RCB released players list : वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.
RCB Retention List : फाफ डु प्लेसिस(कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विश्वास विजय कुमार, आकाशदीप, मोहम्मद सिराज, हिमन्स, मोहम्मद सिराज, रेस शर्मा, राजन कुमार.
4. चेन्नई सुपरकिंग्स
CSK released players list : बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, आकाश सिंग, काइल जेमिसन, सिसांडा मगाला.
CSK Retention List : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हंगरगेकर, दीपक चहर, महिष तिक्षिणा, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी. सोलंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिशा पाथीराना.
5. गुजरात टायटन्स
GT released players list : यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.
GT Retention List : हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू शॉर्ट, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान. , जोशुआ लिटल, मोहित शर्मा.
6. लखनौ सुपर जायंट्स :
LSG released players list : जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, अर्पित गुलेरिया, सुर्यान्स सेडगे, करुण नायर.
LSG Retention List : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, अमित मिश्रा. मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान.
7. सनरायझर्स हैदराबाद :
SRH Released players List : हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसैन, आदिल रशीद.
SRH Retention List : एडेन मार्करम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को येनेसन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी.
8. पंजाब किंग्स :
PBKS Released players List : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान.
PBKS Retention List : शिखर धवन(कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरन, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, गुरनूर सिंग ब्रार, शिवम सिंग, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, विद्वान. कावेरप्पा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस.
9. राजस्थान रॉयल्स :
RR Released players List : जो रूट, अब्दुल बाशित, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ.
RR Retention List : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फेरेरिया, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, अॅडम चहल. , आवेश खान
10. दिल्ली कॅपिटल्स :
DC Released players List : मनीष पांडे, राइलो रुसो, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, फ्लिप सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.
DC Retention List : ऋषभ पंत(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नोर्टजे, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.