( राजापूर )
राजापूर तालुक्यातील वडदहसोळ गावामध्ये अन्य गावातील एका जोडप्याने येऊन देशी दारूची अवैधरित्या विक्री करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी चांगलाच इंगा दाखविला. या जोडप्याला रंगेहाथ पकडून राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी प्रदीप आंबोळकर (साटवली) याला पत्नीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लांजा तालुक्यातील साटवली येथील प्रदिप आंबोळकर आणि त्याची पत्नी वडदहसोळ गावात अवैधरित्या देशी दारूची विकी करत असल्याची माहिती गावातील महिलांनी गावचे पोलिस पाटील जितेंद्र जाधव आणि गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव पड्यार यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील व तंटामुक्त समिती अध्यक्ष यांनी प्रमुख गावकऱ्यांसह प्रदिप आंबोळकर आणि त्यांच्या पत्नीला गावात दारू विक्री करू नको अशी समज दिली होती. तरीही हे जोडपे छुप्या पद्धतीने दारू विक्री करत होते. त्यामुळे पोलिस पाटील जितेंद्र जाधव यांनी ही बाब राजापूर पोलिस स्टेशनच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राजापूर पोलीस स्थानकातील वाघाटे, तिवरेकर, घोळवे आणि महिला पोलिस कर्मचारी नामये यांनी गावचे पोलिस पाटील व तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्यासह गावकर अशोक पळसमकर, गंगाराम म्हादये, प्रकाश पळसमकर, विठ्ठल पळसमकर, महीला सौ.उर्मिला पळसमकर, सौ.लक्ष्मी पळसमकर, स्वप्नाली पळसमकर, ऐश्वर्या गोंडाळ यांनी देशी दारू विक्री करणाऱ्या आंबोळकर दांम्पत्यावर कारवाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
*🚨रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
Reg. No. MH-28-0009536
➡️ बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क : 9527509806