(दापोली)
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ६५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उंबर्ले काटेवाडी (ता. दापोली) येथे घडला. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीप्रकरणी शुभम चंद्रकांत दवंडे (२६, रा. भिवंडी मुंबई, सध्या रा. उंबर्ले) याने फिर्याद दिली आहे. शुभम याला भागेश भाग्यम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने gritshipmanagement@gmail.c om, sys-egovernance@dgshiping.org या ई-मेलवरून व ९३७२८९५१७X या क्रमांकावरून मेसेज केले. या मेसेजद्वारे नोकरीला लावतो, असे सांगितले होते. त्यासाठी शुभमकडून ६५ हजार रुपये घेतले होते. पैसे स्वीकारूनही त्याला नोकरीला लावलेले नाही. आपली फसवणूक झाल्याचे कळताच शुभम याने पोलिस स्थानकात फिर्याद दिली