( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महापरिवर्तन सहकार आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यामध्ये महापरिवर्तन सहकार आघाडीला सभासदांमधून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचारात “नको आम्हाला भव्यदिव्य टोलेजंग इमारती,आम्हाला हवी कर्ज व्याजातील कपाती” या एकमेव घोष वाक्यानेच दबदबा निर्माण केला आहे. १६ जागांसाठी येत्या ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल ५ नोव्हेंबरला होईल. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ५ हजार २०० मतदार आपला कौल देणार आहेत.
होऊ घातलेल्या निवडणुकीत महापरीवर्तन सहकार आघाडीचे १६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये जिल्हा कार्यक्षेत्रात राखीव उमेदवार सात तर तालुक्यात प्रत्येकी एक असे उमेदवार आहे. या महापरीवर्तन सहकार आघाडीमध्ये तेरा घटक संघटना समाविष्ट झालेल्या आहेत. महापरिवर्तन सहकार आघाडीने दिलेला वचननामा सभासदांना पसंद पडत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेला चिपळूण बांधकाम घोटाळा यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सुर आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचारात फिरत असताना सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा परिवर्तन आघाडीला मिळत असल्याचे परिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रकाश काजवे, प्रदीप पवार ,विकास नलावडे यांनी सांगितले. यावेळची निवडणूक एकतर्फी होत असून महापरिवर्तन सहकार आघाडीला 70 टक्के पेक्षा अधिकचे मतदान जिल्ह्यात होईल असे प्रकाश काजवे यांनी सांगितले आहे.