(लांजा)
दुकानाच्या शटरची कुलपे तोडून आतील बॅटऱ्या आणि रोख रक्कम असा सुमारे २५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी (ता. ६) रात्री कोर्ले फाटा उपशेट्येवाडी येथे घडली.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोर्ले फाटा उपशेट्येवाडी येथे उमेश श्रीरंग पेटकर (रा. खावडकरवाडी, लांजा) यांचे कोर्लेफाटा उपशेट्येवाडी येथे अभिषेक बॅटरी या नावाचे दुकान आहे. उमेश पेटकर हे शुक्रवारी (ता. ६) नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी (ता. ७) सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या दोन्ही शटरची कुलपे हत्याराने तोडल्याचे लक्षात आले.
दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच पेटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील ३ हजार ७३६ रुपयांची एक बॅटरी, ३ हजार ४८९ रुपयांची बॅटरी, तसेच दहा हजाराचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण २४ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला