( संगमेश्वर )
तालुक्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून भाविकांनी सोमवारपासूनच गणेशमूर्ती वाजतगाजत मिरवणुकीने नेणे पसंद केले. देवरूख पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ३७९२ व ७ सार्वजनिक गणपतींची नोंद आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३४४१ घरगुती व १ सार्वजनिक गणेशोत्सवाची नोंद आहे.
देवरूख व संगमेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस व्हॅनमधून गर्दीच्या ठिकाणी भाविकांना सुरक्षेच्या सूचना देण्यात येत आहेत. मंगळवारी (ता. १९) गणेशचर्तुर्थीला गणरायांची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना होणार असून दुपारी व रात्री आरत्यांचे सूर घुमणार आहेत.