(कोलंबो)
मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले आहे. कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव ५० धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले.
शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे. कोलंबो येथे सुरु असलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. सिराज आणि हार्दिकच्या माऱ्यापुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांत आटोपला. मोहम्मद सिराज याने सहा फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर मोहम्मद सिराज नावाचे वादळ आले होते. या वादळापुढे गतविजेत्या श्रीलंकेने लोटांगण घातले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने भेदक मारा केला. सिराजच्या माऱ्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद सिराज याने आघाडीच्या सहा श्रीलंकन फलंदाजांना तंबूत धाडले. तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह याने एक विकेट घेतली. श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून मिळाली इतकी रक्कम
श्रीलंकेला टीम इंडियाने फक्त 50 धावांमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेचे अवघ्या 15.2 षटकांत सर्व गडी बाद झाले. भारताने 51 धावांचं लक्ष्य केवळ 6.1 षटकांत पूर्ण केलं आणि दणदणीत विजय मिळवला. आशिया चषक 2023 विजेत्या टीम इंडियाला 1,50,000 डॉलर्स (US$) बक्षीस म्हणून मिळाले. 1,50,000 यूएस डॉलर्स म्हणजे 1,24,63,552 रुपये. यासोबतच उपविजेत्या श्रीलंकेच्या संघाला म्हणून 75,000 डॉलर्स (US$) रक्कम म्हणजेच सुमारे 62,31,776 रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.