(नवी दिल्ली)
सन २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. भाजप सप्टेंबर अखेर देशभरात २५० हून अधिक कॉल सेंटर सुरू करणार आहे. दोन लोकसभेच्या जागांसाठी एक कॉल सेंटर असेल. प्रत्येक केंद्राशी २० हजार कार्यकर्ते जोडले जातील, जे सतत २४७७ लोकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवतील. २०१९ प्रमाणे यावेळीही मोबाइल फोन हे सर्वात मोठे साधन ठरणार आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी कॉल सेंटर सुरू करण्यासाठी वरिष्ठ पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. त्यांना प्रेझेंटेशन देऊन प्रचाराचे काम कसे पार पाडायचे ते समजावून सांगितले आहे. कॉलर रिअल टाइममध्ये सूचना पाठवतील. कॉल सेंटरच्या माध्यमातूनच केंद्रीय नेतृत्व वास्तविक भौगोलिक स्थानानुसार इनपुट घेतील. जाहीरनामा, कथा तयार करणे आणि मुद्दे शोधण्याचे काम ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होईल. पंतप्रधान मोदी यांच्या १२७ सभांची योजना आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आढावा घेतल्यानंतर रॅलींची संख्या वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. या मोहिमेची औपचारिक घोषणा जानेवारीत होणार आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करून निवडणुका जाहीर होतील असे मानले जात आहे.
प्रत्येक राज्यात २ वॉररूम
कॉल सेंटर व्यतिरिक्त, भाजप राज्यवार दोन निवडणूक वॉररूम तयार करेल, जिथे विरोधी पक्षांच्या बैठकांचे भौगोलिक-मॅंिपग असेल. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये तीन ते चार वॉररूम असतील. उर्वरित राज्यांत जेथे जागांची संख्या १०किंवा अधिक आहे. तेथे दोन वॉररूम असतील. सूत्रांच्या मते जिओ-मॅपिंगद्वारे, विरोधी पक्षांचे युक्तिवाद आणि आश्वासने सांगणारे संदेश विरोधी पक्षांच्या रॅली आणि सभांना उपस्थित लोकांच्या मोबाईल फोनवर त्वरित पोहोचतील.