(खेड / भरत निकम)
जपान शतोकान कराटे असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने घेतलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करत १३ सुवर्ण, १३ रौप्य व १० कांस्य पदकांची कमाई केली आहे.
या जिल्हास्तरीय कराटे संपूर्ण जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये काता कराटे प्रकारात ७ ते ८ या वयोगटामध्ये सुवर्णपदक अशर चैगुले, शौर्या म्हस्के, अजिंक्य करबले, अलोकी पवार यांनी रौप्यपदक रिदान पाटणे, रुद्र भारदे, प्रणाली नरळे आणि कांस्यपदक महमद रहम, सारा क्षीरसागर यांनी प्राप्त केले.
१० ते १३ या वयोगटात सुवर्णपदक राजनंदिनी शिवतरे, पार्थ पाटील, राजलक्ष्मी पवार यांनी रौप्यपदक वेदांत देवाडिगा, आदित्य चव्हाण, कार्तिक जगताप यांनी तर कांस्यपदक दुर्वांक राऊत, कार्तिक दरेकर, मानस पाटणे, शौर्य पवार, रत्नराज भालेराव यांनी मिळवले. १३ वर्षे वयोगटात सुवर्णपदक आरूष लेंढे यान रौप्यपदक राघव भारदे व क्षितीजा खांडके यांनी मिळवले. १६ वर्षे वयोगटामध्ये सुवर्णपदक शुभम भंडारे, रौप्यपदक ओम जगताप आणि कांस्यपदक सारंग दिवेकर यांनी पटकाविले. कुमिते कराटे प्रकारात ७ ते ९ या वयोगटातून सुवर्णपदक राजलक्ष्मी पवार (बेस्ट काता चषक), अजिंक्य करबेले, रौप्यपदक अशर चौगुले, रिदान पाटणे, आदित्य चव्हाण, मानस पाटणे व कांस्यपदक वेदांन देवाडिगा, शौर्या पवार यांनी १३ वर्षे या वयोगटामध्ये रौप्यपदक आरूष लेंढे, १६ वर्षे वयोगटामध्ये सुवर्णपदक शुभम भंडारे (बेस्ट काता चषक) प्राप्त करीत जिल्हास्तरावर प्रशालेचे नाव गौरविले आहे.
यशस्वी कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक दीपक कदम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी कराटेपटुंना शुभेच्छा दिल्या.