विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञानंदचा पराभव केला. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसनने प्रज्ञानंदला पराभूत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनवर नाव कोरले आहे. मॅग्नस कार्लसन अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ होता. मात्र त्या स्थितीतही त्याने आर. प्रज्ञानंदला चांगली झुंज दिली. दरम्यान आर. प्रज्ञानंदचा पराभव झाला असला तरी त्याने मॅग्नस कार्लसनला त्याने चांगलीची झुंज दिली. अझरबैजानच्या बाकू या ठिकाणी हा अंतिम सामना पार पडला आहे.
🏆 Magnus Carlsen is the winner of the 2023 FIDE World Cup! 🏆
Magnus prevails against Praggnanandhaa in a thrilling tiebreak and adds one more prestigious trophy to his collection! Congratulations! 👏
📷 Stev Bonhage #FIDEWorldCup pic.twitter.com/sUjBdgAb7a
— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली. टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी 25-25 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकाणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.
बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद रौप्यपदक पटकावले. फिडे बुद्धिबळ विश्वचषक उपविजेत्या आर प्रज्ञानंदचे ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. प्रज्ञानंदचा मला अभिमान असल्याचे पीएम मोदींनी सांगितले. तर, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, प्रज्ञानंद यांनी प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “फिडे विश्वचषक स्पर्धेत प्रज्ञानंद यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. फायनलमध्ये मॅग्नस कार्लसनसारख्या खेळाडूंना कडवी झुंज देण्यासाठी त्यांनी अपवादात्मक कौशल्य दाखवले. हा काही छोटासा पराक्रम नाही. पुढील स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा!”