रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना संघटन वाढवणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिकाला बळ देण्याचे प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके करत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांच्या जिल्हाप्रमुख पदाच्या कालखंडात जिल्ह्यातील शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यातूनच विविध निंवडणुकांमध्ये शिवसेनेला अभूतपूर्व असे यश मिळाले. यापुढील काळात हे संघटन अधिक वाढण्यावर आपला भर असेल, असे श्री. चाळके सांगतात.
राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे. विविध घटकातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेनेकडून केले जाते. तोच वसा जपत श्री. विलास चाळके यांनी आपली जिल्हाप्रमुख पदाची वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून काम करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देताना, गावागावात विकास कामे कशी मार्गी लागतील यावरही त्यांनी भर दिला.
खरतर श्री. चाळके यांनी ग्रामपंचायतीपासून कामाला सुरुवात केली. २००४ मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. गावात अधिक विकास कामे करण्याकडे त्यांचा अधिक कल राहिला. यातूनच त्यांना सर्वप्रथम २००७ मध्ये पंचायत समितीमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करत, शिवसेनेत आपला वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर जिल्हा परिषदेत त्यांनी २०१२ मध्ये पाऊल ठेवले. याठिकाणीही त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवत आपल्या भागातील विकास कामांना गती देण्याचे काम केले. सर्वसामान्य शिवसैनिकाला सोबत घेत त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. यातूनच संघटनेकडून त्यांचा कामाची दाखल घेत त्यांच्याकडे जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ समितीचे महत्वपूर्ण असे सभापती पद दिले. सभापतींच्या काळातही त्यांनी उत्तमपणे काम करण्यावर भर दिला.
सध्यस्थितीत त्यांच्याकडे शिवसेनेतील उच्च असे जिल्हाप्रमुख पद सोपवण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख म्हणून श्री. चाळके यांनी गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर अधिक भर दिला. यातूनच विविध निवडणुकांमध्ये शिवसेनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले. खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, श्री. किरण सामंत यांच्यासह जिल्हातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे श्री. चाळके यांनी सांगितले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण हे काम करू शकलो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख श्री. विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!