(लांजा / वार्ताहर)
किरण उर्फ भैय्या सामंत मित्रमंडळ लांजाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते फित कापून व नंतर श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेला लांजा वासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल लांजा ते कुवे फाटा अशी पार पडली. मोठा गट, लहान गट व स्लो साइकलिंग अशा पद्धतिने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बाल गटात प्रथम क्रमांक आसीम नेवरेकर रोख रक्कम ३,०००/- रु., द्वितीय यशराज मोहिते २,०००/- रु., तृतीय निशांत कदम १,०००/- रु. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक परेश पवार यांनी पटकावला. त्यांना रोख रक्कम ५,०००/-रु., द्वितीय श्रीकांत करमरकर ४,०००/-रु., तृतीय अनिरूद्ध गोसावी ३,०००/-रु. तसेच खुला गट विशेष स्लो-सायकलिंग स्पर्धा मध्ये प्रथम आलेल्या सार्थक गादीकर याला रोख रक्कम १५००/- रु, द्वितीय केयुर साळूंखे १०००/- रु. व तृतीय साहिल कुरूप याला ५००/- रु. आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भैय्या सामंत मित्रमंडळ लांजाचे अध्यक्ष नंदराज उर्फ लल्ल्या कुरुप, उपाध्यक्ष बापू लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला तहसीलदार प्रमोद कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील कुरूप, युवासेना जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगरसेवक सचिन डोंगरकर, रफीक नेवरेकर, संजय यादव नगरसेविका दूर्वा भाईशेट्ये, मधुरा लांजेकर तसेच संजय तेंडुलकर, भाई कामत, आशिष रेऊरकर, प्रसाद भाईशेट्ये, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत आयरे, नाजीम नेवरेकर, बाबा लांजेकर, योगेश वाघधरे, साईप्रसाद जुवेकर, आदी उपस्थित होते. क्रिडा शिक्षक रविंद्र वासुरकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच सुत्रसंचालन विजय हटकर यांनी केले.