(खेड / भरत निकम)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या खेड मदतग्रुपचा यथोचित सत्कार करताना सन्मान केला आहे.
मदतग्रुपने ईर्शाळवाडीतील दुर्घटना, महामार्गावरील अपघात अशा विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे. मदतग्रुपचे पथक सदैव निरपेक्ष भावनेने स्वखर्चाने गरजेच्या ठिकाणी जाऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत मदतकार्य करीत आहे. अपघात घडला, नैसर्गिक आपत्ती काळात, पुराचे पाणी भरलेल्या ठिकाणी, घाटात वाहनं खोलदरीत कोसळले तरी तिथे खेड मदतग्रुपचे सहकारी विनम्रपणे मदतीचा हात पुढे करत आहेत. या अशा विविधांगी सामाजिक कार्याची दखल घेऊन लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने १५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून कंपनीचे अधिकारी श्री. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी कंपनीचे सर्व अधिकार आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.