( रत्नागिरी /प्रतिनिधी )
हातखंबा येथील लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल यांचे वतीने श्रीकांत उर्फ भाई शेठ मापुसकर आर्ट्स कॉमर्स संयुक्त जुनियर कॉलेज हातखंबा या ठिकाणी आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष श्री मनोज कुमार खानविलकर यांनी पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी यासाठी विद्यार्थ्यांच्या मार्फत आरोग्य विषयक माहितीपत्रक देऊन आपले व आपल्या परिसरातील नागरिकांची आरोग्य जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी क्लबचे उपाध्यक्ष गिरीश शितप सदस्य श्री अवधूत कळंबटे व सौ मनस्वी जाधव उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुभाष रानमाळे यांनी केले तसेच कार्यक्रमास प्रा. अनिता पाटील, प्रा. अनन्या पवार व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.