(रत्नागिरी)
गुरुवार दिनांक 3/8/2023 रोजी ग्रामपंचायत जयगड मधील विद्यमान उपसरपंच, सदस्य यांनी मिळून जयगड खाडी परिसर बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती स्थापन करण्याचे प्रमुख उद्दिष्ट जयगड खाडी परिसरतील नागरिक, पर्यटक, मच्छीमार यांच्या कडून सतत तक्रारी येत होत्या. जयगड गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. तसेच, खाडी लगत राहणारे नागरिक यांना मासेमारी करताना खूप वाईट अनुभव येत आहेत. विषयाचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांना सावधान करणे, मच्छीमारांचा जीव वाचवणे या एका उद्दिष्टाने जयगड ग्रामपंचायत मधील उपसरपंच श्री.अमेय पारकर, सदस्य सौ.देवयानी देविदास खाडे, सौ.अक्षदा अविनाश देवरुखकर, श्री.विशाल झगडे, श्री.शौकत डांगे, श्री.मुनाफ संसारे तसेच काही ग्रामस्थ मिळून या कृती समितीची स्थापना करण्यात आली.
या कृती समितीच्या माध्यमातून वेळोवेळी बॅनर लावून जन जागृती करण्यात येत आहे. सर्वच स्तरातून या कृती समितीचे कौतुक करण्यात येत आहे.