(माणगाव/ कुडाळ)
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोलीच्या कृषी सह्याद्री गट आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी चिकित्सालय व कृषी गुणन केंद्र, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिरवळीच्या खताचे वापर व त्याचे शेतीस होणारे विविध प्रकारचे फायदे या संदर्भात प्रात्यक्षिक पार पडले. हिरवळीच्या खताचे वापर केल्याने माती मधील नत्र चे प्रमाण वाढते व मातीची गुणवत्ता सुधारते, तसेच सेंद्रिय खताचे वापर केल्याने शेतीची उगवण क्षमता खालावत नाही आणि जमिनीची पोत सुधारते, यामुळे पिकांची वाढ उत्कृष्टरित्या होते.
कृषी गुणन केंद्राचे डॉ. रेडेकर आणि सचिन मोरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले व कृषी सह्याद्री गटाच्या प्रतीक चेडे आणि श्रीकांत शिंदे यांनी हिरवळीच्या खताचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवम घरबुडे आणि आभार प्रदर्शन यश पवार यांनी केले सोबतच रोशन पाटील, संकेत देशमुख, गौरव मिसाळ आणि सुबोध नलवडे यांनी प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडण्यास मोलाचे योगदान दिले.
कृषी सह्याद्री गटाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. संदिप गुरव, कार्यक्रमाधिकारी डॉ. रणजित देव्हारे, विषय विशेषज्ञ डॉ. विरेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आणि ग्रामपंचायत माणगाव यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.