(रत्नागिरी)
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर घटना सोमवार २४ जुलै रोजी सकाळी ८.२५ वा. उघडकीस आली.
दिनेश जितू चौहान (४६, मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा. कांबळे लावगण वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सोमवारी सकाळी दिनेशचा सहकारी त्याला कामावर जाण्यासाठी उठवण्याकरता गेला असता त्याला दिनेश कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून आले. त्याने आजुबाजुच्या लोकांना तसेच मालकाला याची माहिती दिली. मालकाने दिनेशला तातडीने डॉ. लंबे यांच्याकडे नेले असता त्यांनी दिनेशला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.