(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी हातखंबा मार्गावर पानवल येथील वळणावर मंगळवारी ( दिनांक २५ जुलै २०२३ ) सकाळी सवानऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने हुल दिल्याने दुचाकीचा स्लीप होऊन अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवरुख ते रत्नागिरी दुचाकीने (क्रमांक- MH08-BA-7310) दुर्वेश गजानन पांचाळ (वय 19- राहणार,आंबव देवरुख) गजानन विश्वनाथ पांचाळ (वय 42, राहणार -आंबव देवरुख) हे दोघे प्रवास करीत होते.
प्रवास करीत असताना पानवल येथे वळणावर आले असता पांचाळ यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुल दिली. वळणावरच हुल दिल्याने दुचाकी स्लीप झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. एकास पायाला व डोक्याला गंभीर मार लागला.
या अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांचे हातखंबा रुग्णवाहिका चालक धनेश केतकर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णवाहकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हातखंबा टॅबचे वाहतूक पोलीस पावसकर यांच्यासह इतर सहकारी पोलीसांनी देखील घटनास्थळी धाव घेत अपघातांची माहिती घेतली.